मी MBA आणि लग्न
शिक्षण संपले आता हिचे लग्न टाकावे करून
आई-बाबांची अशी कुजबुज कानावर आली
नाही नाही आधी MBA टाकावे उरकून
लागलीच अशी मी घोषणा केली.
आणि तशी आमची तयारी जोमाने सुरू झाली
Oxford dictionary ती पूर्ण कोळून प्यालि
Maths चे कोणतेही problem सोडवायचे राहीले नाही
बाबांची अभ्यासाची कुरकुर मात्र कधीच थांबली नाही
Illogical reasoning सोडवताना lose व्हायचा माझा temper
त्यावर बाबांचा comment, " काही नाही, आले आहे तुला examination fever"
Visual reasoning कसलं, होता डोळ्यांसोबत जिवाला ही त्रास
त्यावर आईचा taunt, " आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास!"
शेवटी काय होतं या पोरीचं ह्या विचाराने
आई-बाबांच्या चेहृयावर होते expression perplexed
आणि इथे माझ्या अती हुशार मित्रांमुळे
येत होते मला inferiority complex!
म्हणता म्हणता entrance date जवळ आली
राडता पडता exam ही झाली
लवकरच results चे काळे ढग आले दाटून
आणि चांगले marks मिळाल्यावर आई-बाबांना ही हायसे गेले वाटून!
मग काय, नागपूर पुष्कळ पाहिले आता थेट पुणे गाठायचे
आणि सगळ्यांच्या नाकावर टिचवून आपण नगपुरी पुणेकर व्हायचे
ह्या विचारने पुण्याची गाडी पकडून निघाली आमची स्वारी
पण तिथे पोहचून झाले confusion लैच भारी!
ह्याने इथून तर त्याने तिथून MBA केले आहे
आणि इथली placement अशी आणि तिथली तशीच आहे
असे धक्के खात झटके झेलत गाडीचं engine पुढे सरकत होतं
आणि decision कसलं confusion अधिकच वाढत होतं
मग एक काका मदतीला आले, म्हणाले lets look into the matter deeper
आणि आम्ही discuss केले MBA over the dinner
ते बोलू लागले-
"आमच्या मेहुण्याच्या चुलत बहिणीच्या सख्या दीरने
अमुक insti तून MBA केले आहे,
placement ही चांगली आहे, पुढे अमेरिकेचाही chance आहे
मुलगा चांगला आहे, उंची 6 फूट आहे!"
गाडी आता अपघाती वळणावर आली आहे, हे मला कळले
आणि मी पीत असलेले veg clear soup सुद्धा माझा घशात अडकले!!
पुढे अपघात झालाच-
" मुलगा लाखात एक आहे, जास्तं विचार करू नका
असे स्थळ पुन्हा सांगून येणार नाही, यंदा बार उडवून टाका!
घराणे पण चांगले आहे, मी सांगतो तुम्हाला पटेल
गोरा गोम्टा जावई कोल्हटकरांचा शोभून दिसेल!!"
पुढे आई-बाबांनीही समजावले-
"मुलगा आहे चांगला, तुमचा जोडा आहे perfect
लग्न की MBA? आता तूच करायचे आहे select!"
शेवटी माझाच हातात माझे भाग्य होते
आणि सर्वांना चटकन उत्तर देणे हेच योग्य होते
म्हणून पुष्कळ झाले आता सरळ लावू निशाणा
अशा निर्धाराने घेतला मी हा उखाणा -
लग्न असो वा success
celebrate करण्यासाठी खातात सगळे पेढा
MBA रावांचं नाव घेते
आता जीव माझा सोडा!!!
Friday, April 10, 2009
Subscribe to:
Posts (Atom)